Type Here to Get Search Results !

DFSL Bharti 2024 maharashtra :- गृह विभाग मध्ये 125 पदांची भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज

DFSL Bharti

DFSL Bharti 2024 maharashtra :- गृह विभाग मध्ये 125 पदांची भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज

DFSL Bharti 2024 :-  नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी! न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (fsl) मध्ये एकुण 125 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. DFSL भरती मध्ये वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक या पदांसाठी पदे भरली जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज www.dfsl.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून पदानुसार पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया केवळ लेखी परीक्षा (TCS) द्वारे घेतली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.


DFSL recuirement Notification 2024 in Marathi : (FSL) भरतीची ठळक वैशिष्ट्ये

DFSL Bharti 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई
एकूण जागा 125 जागा
नोकरी ठिकाण मुंबई 
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी राज्य सरकार नौकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 06 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.dfsl.maharashtra.gov.in

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : DFSL vacancy 2024

DFSL भरतीच्या एकून 125 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.

पदाचे नाव  रिक्त पदे 
वैज्ञानिक सहाय्यक (गट अ) 54
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण), (गट क) 15
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट अ) 2
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क) 30
वरिष्ठ लिपिक (स्टोअर) (गट अ) 5
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, (गट क) 18
व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 18

शैक्षणिक पात्रता : Education Qualification for dfsl bharti 2024

(DFSL) भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालीलप्रमाणे दिले आहे.


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहाय्यक (गट अ) १) विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण. किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण), (गट क) २) विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट अ) ३) मानसशास्त्र विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क) ४) विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक (स्टोअर) (गट अ) ५) विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, (गट क) ६) विज्ञान विषयासह माध्यमिक विद्यालय परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण.
व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) ७) माध्यमिक विद्यालय परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.

निवड प्रक्रिया : selection process for DFSL bharti 2024

DFSL भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा (TCS) द्वारे निवड केली जाईल. जर तुम्ही मुलाखतीत उत्तीर्ण झालात तर तुमची निवड (Directorate of Forensic Science Laboratories Mumbai) मध्ये पदासाठी केली जाईल.
  • ऑनलाईन परीक्षा (TCS)

वेतन श्रेणी : pay scale for DFSL bharti 2024

न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय मुंबई मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500 ते 92,300 पर्यंत पगार दिला जाहील.
  • 25,500 ते 92,300

वय मर्यादा : Age limit for DFSL bharti 2024

न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. (DFSL) च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातनुसार, 06 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {60 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्ष}
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 38 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees for DFSL bharti 2024

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 900 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
  • GEN/OBC/EWS :- 1000 रुपय 
  • SC/ST/PWD/ESM :- 900 रुपय 

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : gender Eligibility for dfsl bharti 2024

न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय भरती मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला 

महत्वाच्या तारखा : Important Dates For DFSL recuirement 2024

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 06 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

📌 Apply start Date : - 06 फेब्रुवारी 2024

📌 Apply last Date : - 27 फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज करा : Apply online link for DFSL bharti 2024

न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय भरती २०२४ साठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] 👉येथे क्लिक करा
Apply Now 👉येथे क्लिक करा


सूचना :

इच्छुक उमेदवार [ DFSL bharti 2024 Mumbai] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात [PDF] काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (27 फेब्रुवारी 2024) आहे.

DFSL bharti 2024 अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे.
FAQ 

 DFSL Bharti 2024: अर्ज कसा करावा?
-DFSL bharti 2024 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठी, "तुम्हाला न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय (dfsl)" च्या अधिकृत वेबसाइट https://dfsl.maharashtra.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर, तुम्हाला “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे लागेल.
लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.


Join Our WhatsApp Group!